About us
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ शाळेची स्थापना १ जुलै १९५८ रोजी झाली. या विद्यालयात आज ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यात ५ वी ते १० वी पर्यंत माध्यमिक विभाग असून १४२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व ११ वी १२ वी कनिष्ठ महाविद्यालय विभाग सुरु आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आहेत. यात जवळ जवळ १२२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. कुडाच्या झोपडीत सुरु झालेली शाळ आज सर्व सुविधांनी युक्त अशा भव्य इमारतीत रुपांतरीत झालेली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण आहे. विद्यार्थ्यांची व शिक्षकांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी ग्रंथालय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी व अध्यापन करण्यासाठी संगणक कक्ष आहे. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती व्हावी, त्यांना वेगवेगळे प्रयोग करता यावेत यासाठी बालविज्ञान भवन, अटल टिकरिंग लॅब व सुसज्ज प्रयोगशाळा आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.
Recent News
ध्येय व उद्दिष्टे –
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे.
- आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
- विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे.
- विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व जागृती करणे
- विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- विद्यार्थ्यांना जीवन विकासाचे व उच्च दर्जाचे शिक्षण देणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.