News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे स्व.डॉ.विजयजी बिडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पेठ दि.03/10/2025 रोजी - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  पेठ  येथे आदिवासींचे आरोग्यदूत व डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव स्व.डॉ.विजयजी बिडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक यांच्या सौजन्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम पंचायत समिती पेठचे गटशिक्षणाधिकारी श्री.मौळे साहेब यांच्या हस्ते स्व.डॉ.विजय बिडकर यांच्या पुतळ्याचे व कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य श्री.अशोक नंदन सर यांनी रक्तदान शिबिर हा उपक्रम स्व.डॉ.विजय बिडकर यांच्या समाजकार्याने प्रेरित होऊनच घेतला असे प्रतिपादन केले व रक्तदानाचे महत्त्व सांगितले. उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला सर यांनी रक्तदानाचे महत्व व फायदे याविषयी माहिती दिली. शिक्षक,शिक्षिका, सिनियर कॉलेज पेठेचे प्राध्यापक, दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडियमचे शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी या मानवतावादी कार्यात उत्साहाने सहभाग घेत 100 पेक्षा अधिक लोकांनी हिमोग्लोबिन, शुगर व बीपी तपासणी केली आणि रक्तदानाने 45 ब्लड बॅग संकलन झाले. जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक चे BTO डॉ.हेमंत बागुल, PRO श्री.केशव गोडसे, श्री.देविदास भांगरे, टेक्निशियन श्री.लालसिंग पावरा व त्यांचे इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख सर, मुख्यलिपिक श्री.अनिल गांगोडे,वरिष्ठ लिपीक श्री. अजय वाघ, किमान कौ.चे वरिष्ठ लिपीक श्री.शरद सोनवणे,पालक, ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.