पेठ - दि. 4- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव,नि:स्पृह सेवक,आरोग्यदूत, क्रीडाप्रेमी,वाचनाचे व्यासंगी,निसर्गप्रेमी स्व.डॉ.विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर होते. सर्वप्रथम डॉक्टर साहेबांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.यात
इयत्ता ५वी ते ७ वी गट
प्रथम - श्रेयश ढाकणे
द्वितीय - असबाह शेख
द्वितीय - अन्याना जाधव
तृतीय - हर्षल दळवी
इयत्ता ८वी ते १०वी गट
प्रथम - मृणाल भसरे
द्वितीय - मयुरी वाघमारे
तृतीय - श्रावणी पवार
यानंतर शिक्षक श्री.जनार्दन वाघमारे यांनी डॉक्टर साहेबांच्या जीवनावरील स्वरचित कविता सादर केली.तसेच शिक्षक मनोगत घेण्यात आले. यात शिक्षिका श्रीमती.सुरेखा पवार, श्रीमती.ज्योती ब्राह्मणकार तर शिक्षक श्री.निलेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला सर यांनी डॉक्टर साहेबांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून श्री.अशोक नंदन सर यांनी डॉक्टर साहेबांच्या विचारावर प्रकाश टाकला व त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर व विद्यार्थी उपस्थित होते.
