पेठ -दि.०२-१०-२०२५ डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नंदन ए.एल.सर होते. यावेळी उपमुख्याध्यापक श्री.केला डी.जी. यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री.नंदन ए.एल.यांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिला. सूत्रसंचलन श्री.सोनवणे एस.जे. यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राथ.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका श्रीमती.शिंदे मॅडम, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.देशमुख के.के.सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
