*🌹तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात विद्यालयाचे घवघवीत यश*🌹
पेठ - दिनांक 12/08/2026 रोजी अनुदानित आश्रम शाळा निरगुडे येथे *तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले या विज्ञान मेळाव्यात *डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी काव्या शशिकांत पठाडे (इयत्ता 9 वी) हिला तालुक्यातून प्रथम क्रमांकाने मिळाला असून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.तसेच नाट्योत्सव स्पर्धेत विद्यालयाच्या गटाचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला.*
वरील विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा *मा.ताईसाहेब,सचिव मा.मृणालताई जोशी विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन ,पर्यवेक्षक कैलास देशमुख , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सर्व
विजेत्या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक चंद्रकांत केदार श्रीमती सुरेखा पवार , श्रीमती अश्विनी जाधव, चेतन पाठक, पंकज गांगुर्डे, श्रीमती पूजा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले .
