*स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर*
--------------------------------------------
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
*पेठ, दि. ३० सप्टेंबर २०२६* : *डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ आणि कर्मवीर दादासाहेब बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींचे आरोग्यदूत तथा डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव स्व. डॉ. विजयजी बिडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन* करण्यात आले. जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक यांच्या सौजन्याने हे शिबिर संपन्न झाले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणातील स्व. डॉ. विजयजी बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षा मा. ताईसाहेब यांच्या हस्ते रिबीन कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. अशोक नंदन यांनी केले. यावेळी *प्रांताधिकारी मा. श्री. आप्पासाहेब शिंदे तसेच तहसीलदार मा. श्री. शिवाजी गवळी यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन या समाजोपयोगी व मानवतावादी उपक्रमाचे कौतुक* केले.
तसेच यावेळी पॅराऑलिंपिक खेळाडू सुवर्णपदक विजेता दिलीप गावित यांचे प्रशिक्षक श्री.वैजनाथ काळे सर यांनीही या शिबिरास भेट दिली त्यांचे डांग सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्षा मा. ताईसाहेब यांच्या हस्ते स्वागत पर सत्कार करण्यात आला.
या रक्तदान शिबिरास शिक्षक, शिक्षिका, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, दादासाहेब बिडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. *शिबिरामध्ये ५४ हून अधिक नागरिकांची हिमोग्लोबिन, रक्तातील साखर व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली, तर एकूण २५ रक्तपिशव्यांचे संकलन* करण्यात आले.
*जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिकचे जनसंपर्क अधिकारी श्री. प्रदीप देशमुख, श्री. देविदास भांगरे, वैद्यकीय अधिकारी श्री. गोविंद कुलकर्णी, तंत्रज्ञ श्रीमती स्नेहल मावची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.*
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. यू. डी. लाड, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. दिलीप केला, पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जनार्दन वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्री. संजय सोनवणे यांनी केले.
