🌹🌹 *राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयाचे घवघवीत यश* 🌹🌹
दिनांक 08/09/2026 वार मंगळवार रोजी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे *मराठी विज्ञान परिषद व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका सर्धेचे आयोजन करण्यात आले* यात डांग सेवा मंडळ संस्थेतील पाच विद्यालय व सात आश्रमशाळा यांनी सहभाग नोंदवला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हेमलताताई बिडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप हेर्लेकर,श्री.
रवींद्र ढवळे,श्री.अजय दिवेकर,श्री.मिलिंद कुलकर्णी हे होते.परीक्षक म्हणून श्री.आभास आनंद व प्रा श्री नितीन शहाणे होते. या कार्यक्रमात सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान एकांकिका सादर केल्या त्यात डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे स्पर्धेतील बक्षीस मिळवले.वरील सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पाच हजार रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली.
विजयी सर्व विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब सचिव मा.मृणाल ताई जोशी व सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य नंदन सर पर्यवेक्षक देशमुख सर व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री गांगुर्डे सर श्री केदार सर,श्री.केवळ वाघ सर व सर्व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
