डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
*डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ* येथे
🌹 *राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.* 🌹
🌷🌷🌷 पेठ -दिनांक 02/10/2026 वार शुक्रवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे *राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिलीप केला,ज्येष्ठ शिक्षक संजय सोनवणे,केवळ वाघ,यशवंत राऊत,श्रीमती हुंडीवाले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले* सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर शिक्षिका श्रीमती राऊत मॅडम श्री.वाघ सर यांनी गांधीजी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मनोगतातून व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.केला सर यांनी अध्यक्षीय भाषणातून गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवन कार्याचा सविस्तर परिचय करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.जे.सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
