*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,*
*डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ* येथे
*_पालक शिक्षक मेळावा संपन्न_*
--------------------------------------------
पेठ : दि.11/08/2026 मंगळवार रोजी इयत्ता 5 वी ते 10 वी चा *पालक शिक्षक मेळावा* संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर होते. सर्वप्रथम प्रतिमापूजन करण्यात करून आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री.नंदन सर यांनी प्रास्ताविक सादर केले. शिक्षक मनोगतामध्ये श्री. चंद्रकांत केदार, श्रीमती.सुरेखा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी त्यांच्या समस्या, शंका, सूचना मांडल्या.यात श्री.अनिल पवार, श्री.संजय जाधव इ. पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांच्या समस्या आणि अडीअडचणींना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर आणि मुख्य लिपीक श्री.अनिल गांगोडे भाऊसाहेब यांनी समाधानकारक उत्तर दिले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष श्रीमती. वायकंडे ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेतील उपक्रम व शाळेविषयी चांगले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
