डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 महिला तक्रार निवारण समिती तसेच सखी सावित्री समिती स्थापना व मार्गदर्शन-2026/2027 🌹
पेठ : 05/08/2026 बुधवार रोजी महिला तक्रार निवारण समिती तसेच सखी सावित्री सामिती स्थापना करण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक नंदन .पर्यवेक्षक कैलास देशमुख , दादासाहेब बिडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पेठ येथील प्राध्यापिका सौ प्रतिभा शिरसाठ मॅडम जेष्ठ शिक्षिका हुंडीवाले मॅडम , दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य बागुल सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष
विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक नंदन पर्यवेक्षक कैलास देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्यांनी विद्यार्थिनिंना सखी सावित्री समिती याविषयी माहिती सांगितली. मार्गदर्शिका शिरसाठ मॅडम यांनी विद्यार्थींनींना गुड टच, बॅड टच याविषयी तसेच लैगिंग शोषण याविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला शिक्षिका राऊत मॅडम, भोये मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.पवार मॅडम यांनी केले . अशा प्रकारे महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समिती स्थापना व मार्गदर्शन करण्यात आले.
