डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
*डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ* येथे
🌹 *क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा* 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ- दि. 28/11/2026 शनिवार रोजी *डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ* येथे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 136 वा स्मृती दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवर विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन उपमुख्याध्यापक दिलीप केला पर्यवेक्षक कैलास देशमुख सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.शिक्षक केदार सर,संजय सोनवणे सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून त्यांना अभिवादन केले.त्यानंतर उपमुख्याध्यापक केला सर यांनी महात्मा फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदन सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला व शिक्षणाचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे एस.जे.सर यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
