डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
*डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*🌹🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *पेठ*: 09/08/2026 रविवार रोजी *9 ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा* करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे *प्राचार्य अशोक नंदन पर्यवेक्षक कैलास देशमुख* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन व पेठ संस्थानचे राजे श्रीमत श्री.भगवंतराव राजे पवार यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनावर आधारित नृत्य सादर केले.त्यानंतर आर.टी.गावित सर, एस.जे.सोनवणे सर यांनी स्वातंत्र लढ्यातील क्रांतिकारक व आदिवासी दिनाचे महत्व मनोगतातून व्यक्त केले.विद्यालयाचे प्राचार्य नंदन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांतिकारक यांनी देशासाठी दिलेले योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.जे.एच.वाघमारे सर यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
