*डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा संपन्न*
पेठ, ता.०७/१०/२०२६- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे गायत्री परीवार नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षे इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. यात *एकूण १३७८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झालेले होते, त्यापैकी १३५१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.* ही परीक्षा घेण्यासाठी गायत्री परीवारा कडून मा.श्री.जयंती भाई, श्री.विजय भाई व त्यांचे सहकारी उपस्थित होते. ही परीक्षा प्राचार्य श्री.अशोक नंदन, उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला, पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली. यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
