News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, *डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ* येथे 🌹 *आरोग्यदूत स्वर्गीय डॉ विजयजी बिडकर यांची पुण्यतिथी साजरी.* 🌹

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
*डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ* येथे
🌹  *आरोग्यदूत स्वर्गीय डॉ विजयजी बिडकर यांची पुण्यतिथी साजरी.* 🌹
     🌷🌷 पेठ -दिनांक 04/10/2026 वार रविवार रोजी  *आरोग्यदूत, क्रीडाप्रेमी,वृक्षप्रेमी,वाचनाचे व्यासंगी,डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिलीप केला,ज्येष्ठ शिक्षक संजय सोनवणे,केवळ वाघ,यशवंत राऊत,श्रीमती हुंडीवाले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले* सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वर्गीय डॉ.साहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग मनोगतातून व्यक्त केले.त्यानंतर शिक्षक श्री.परदेशी सर,श्री.थोरे सर,श्रीमती.पवार मॅडम यांनी साहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग व अनुभव मनोगतातून व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.केला सर यांनी अध्यक्षीय भाषणातून साहेबांच्या जीवन कार्याचा सविस्तर परिचय करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.जे.सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका वसतिगृह अधिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.