डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे कथकथान स्पर्धा संपन्न
पेठ, दि. ०४- डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने आयोजित ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वाचूया आनंदे' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी वाचन विकास माला भाग १ ते ५ हे विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात आले आहेत. याच पुस्तकावर आधारित संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वप्रथम विद्यालय स्तरावर कथाकथन स्पर्धा घेऊन त्यातील प्रथम तीन विद्यार्थी हे संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी पात्र ठरतील. त्यात आज विद्यालय स्तरीय कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण श्री जनार्दन वाघमारे व श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. यात पाचवी ते नववी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विद्यार्थी विजेते घोषित केले.