पेठ -दि. 29/07/2026 बुधवार रोजी *महर्षी व्यास यांची जयंती गुरूपौर्णिमा* उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. सर्वप्रथम महर्षी व्यास यांच्या प्रतिमचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदन सर व पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर *विद्यालयातील इ.9 वी अ च्या विद्यार्थी यांनी सर्व गुरुजनांना गुलाब पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली व गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.* त्यानंतर उच्च माध्य. विभागाचे प्रा.श्री.संजय सोनवणे व माध्य.विभागाचे शिक्षक श्री.जनार्दन वाघमारे यांनी गुरू पौर्णिमाचे महत्त्व तसेच गुरु शिष्य परंपरा याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी अ च्या विद्यार्थिनी कु.एलिना पठाडे, कु.अनुष्का चौरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन 9वी अ चे विद्यार्थी काव्या पठाडे, शर्वरी पठाडे, विराज पाटील, मोहित शेवरे, ओमकार रहाणे व सर्व विद्यार्थी यांनी मिळून केले.* यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
