News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ* येथे 🌹 *तालुकास्तरीय बालकवी स्पर्धेचे उत्साहात आयोजन* 🌹

*ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आणि डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ* येथे

🌹 *तालुकास्तरीय बालकवी स्पर्धेचे उत्साहात आयोजन* 🌹
    
              पेठ-  दिनांक  03/09/2026 वार गुरुवार रोजी कविवर्य आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बालकवी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती. अनुजा पाठक मुख्याध्यापिका, श्रीम.ज्योती चव्हाण, श्रीम. शितल धनवटे, श्रीम.रंजना पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. अनुजा पाठक यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.अशोक नंदन होते. तसेच पर्यवेक्षक श्री. कैलास देशमुख हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे
*प्रथम गट 3 री ते 5 वी-*
1.नेहा दिलीप देशमुख
2.माही रमेश सोनवणे
3.प्रशिल राहुल सोनवणे

*द्वितीय गट 6 वी ते 8 वी-*
1.हेमांगी किसन ठाकरे
2.निशा नामदेव शेखरे
3.शरयू भगवान पठाडे
उत्तेजनार्थ- आर्या छगन चौधरी

*तृतीय गट 9 वी ते 12 वी-*
1.आरती पंढरीनाथ कडाळी
2.तबसून हरून अन्सारी
3.पेहरीन शहानवाज शेख
उत्तेजनार्थ -श्रावणी राजेश पवार

   वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सोनवणे तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जनार्दन वाघमारे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.