News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ शाळा प्रवेशोत्सव साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ शाळा प्रवेशोत्सव साजरा..

          

           

          

      पेठ : शैक्षणिक वर्ष-2026-27 शाळेचा पहिला दिवस शिक्षणाचा आनंदोत्सव - शाळा प्रवेशोत्सव दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम विद्यालयाच्या प्रवेशद्वार वर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक संच, गुलाब पुष्प, मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती.मनिषा वायकांडे, पालक प्रतिनिधी श्री.कपिल चुंभळे, श्रीमती. लिमले उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. दिलीप केला, पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख, सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.जनार्दन वाघमारे यांनी केले.