डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरा
पेठ -दिनांक 26/06/2026 शुक्रवार रोजी रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदन सर,पर्यवेक्षक श्री.देशमुख सर हे प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी श्री नंदन सर यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा उजाळा करून दिला.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री.वाघमारे सर यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
