News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ शाळेत योगदिन साजरा

डॉ. विजय बिडकर विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा 

🏃‍♀️🧎‍♀️🧎🧎‍♀️🧎🧎‍♀️🏃

पेठ ता.21 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक नंदन सर यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यात क्रीडा शिक्षक श्री. चंद्रशेखर पठाडे व श्री.योगेश भामरे यांनी योग प्रार्थना, शांती मंत्र घेत प्राणायाम, विविध आसने, यांची प्रत्यक्ष कृती सर्वांकडून करून घेतली. तसेच योग हा सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रशेखर काळे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला, पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख, सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.