News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयात "डांग सेवा मंडळ नाशिक" संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयात "डांग सेवा मंडळ नाशिक" संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

         पेठ : डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचा वर्धापन दिन विद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. नंदन सर हे होते त्यांच्या हस्ते दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री नंदन सर यांनी दादासाहेब बिडकर यांच्या जीवनावर व संस्थेविषयी विशेष अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.