डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंतर्गत जनजागृती कार्यक्रम साजरा
पेठ -दि. 24/06/2026 बुधवार रोजी *सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक जिल्हा* यांनी विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनावर विविध प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.यावेळी श्री.महेंद्र दातरंगे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य,श्री.रंजन लोंढे आर्किटेक्ट श्री.उत्तम कराटे बार्टी समन्वयक पेठ तालुका,प्राचार्य श्री नंदन सर,पर्यवेक्षक श्री.देशमुख सर हे प्रमुख उपस्थित होते यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना भोंदूगिरीचे विविध प्रात्यक्षिक श्री.दातरंगे सर यांनी दाखवून जनजागृती केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस जे.यांनी केले.यावेळी विद्यातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
