News Cover Image

श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न  
 
आज दिनांक 09/09/2023 वार शनिवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर,परीक्षक म्हणून डॉ.अंजली पवार मॅडम, ॲड.एकता कदम मॅडम हे प्रमुख उपस्थित होते.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एम.पाटील सर, उपप्राचार्य श्रीमती जे.पी.पवार मॅडम,श्री वेढणे सर हेही उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री पाटील सर यांनी केले.त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील सहभागी  विद्यार्थिनींनी रॅम्प वॉक करून आपले सादरीकरण केले.यावेळी परीक्षक डॉ.अंजली पवार मॅडम यांनी सर्व विद्यार्थिनींना मौलिक असे मार्गदर्शनही केले.सुंदरता  ही सर्वस्वी नसते तर माणुसकी हा सर्वोत्तम गुण असून समाजाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच परीक्षक ॲड.एकता कदम मॅडम यांनीही सहभागी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले व मुलींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा ही दिल्या.त्यानंतर मा.ताईसाहेबां नी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.भविष्यात खूप संधी मिळतात त्यातून कठीण परिश्रम घेऊन सर्वांनी पुढे जावे व भविष्य उज्ज्वल करावे असे सांगितले.यानंतर प्रमुख परीक्षक यांच्या हस्ते  विजेता घोषित करण्यात आली. कु.अस्मिता शिंदे (12वी विज्ञान) हिने यंदाचा श्रावण क्वीन होण्याचा बहुमान मिळवला.तसेच द्वितीय क्रमांक कु. सानिया शेख व तृतीय क्रमांक कु.प्रांजल पठाडे हिने मिळविला . यावेळी सर्व विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच सर्व सहभागी विद्यार्थिनींना  मा.ताईसाहेब यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनिषा हाडपे मॅडम यांनी केले.श्रीमती आचार्य मॅडम यांनी श्रावण क्वीन स्पर्धक विद्यार्थिनींच्या बौद्धिक सौंदर्याचे परीक्षण करण्यासाठी प्रश्नावलीच्या रूपाने संवाद साधला.तसेच या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य श्रीमती पवार मॅडम यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.