News Cover Image

राष्ट्रीय एकता दिवस साजरा

राष्ट्रीय एकता दिवस साजरा
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पेठ येथे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, एकता दिवस व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.