News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे स्काऊट गाईड कॅम्प संपन्न

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे स्काऊट गाईड कॅम्प संपन्न
पेठ, ता. ३१- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम, उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी, यांच्या मार्गदर्शनाने स्काऊट गाईड कॅम्प संपन्न झाला. हा कॅम्प शिराळे या ठिकाणी काढण्यात आला होता. यात सर्व प्रथम तेथे गेल्यानंतर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार केले. सर्व तयारी झाल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.