News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांचा परिचय व्हावा व माहिती व्हावी या उद्देशाने संस्थास्तरीय किल्ला बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण आज साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्यावतीने व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून करण्यात आले या स्पर्धेत एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात
1) मयुरी जनार्दन वाघमारे 
2) मृणाल भगवान भसरे
3) मयुरी लक्ष्मण गावित
4) आदिती किरण भुजाड
5) दिव्या श्रीकिशन ठाकरे
6) रत्ना हिरामण गालट 
7) अनुज शशिकांत पठाडे
8) कुणाल हेमराज जाधव
9) उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व रायगड किल्ला तयार केला. हा किल्ला तयार करण्यासाठी उपशिक्षक श्री.जनार्दन वाघमारे व श्री.ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व वसतिगृह अधीक्षक श्री जितेंद्र सूर्यवंशी व श्री मनोज कुमार सौंदाणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस. व पर्यवेक्षक श्री केला डी जी उपस्थित होते.