News Cover Image

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट
               डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील  मुलं व मुली दोघही संघ नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत तृतीय क्रमांकांने विजयी झाले. जिल्हास्तरावर एकुण १४ संघ सहभागी झाले होते.  यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. हेमलताताई बिडकर, सचिव मा. मृणालताई जोशी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एम. पाटील, उपप्राचार्या श्रीमती पवार जे.पी. उपमुख्याध्यापक श्री. सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.