डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे
राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
आज दिनांक 29/08/2023 वार मंगळवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्राचार्य श्री पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळाचे महत्व आणि मेजर ध्यानचंद यांच्या विषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित गायत्री मंत्राचे पठण ही केले.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर सर उपप्राचार्य श्री देशमुख सर पर्यवेक्षक श्री केला सर ,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
