News Cover Image

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
पेठ- ता. २८- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे माध्यमिक व उच्चमाध्यमिक दोन्ही विभागात महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम सर होते. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर शिक्षकांनी म. फुले यांच्या जीवन व कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यात उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम,सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी.मॅडम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर उपशिक्षक श्री केला डी जी, श्री केदार सी डी, श्री पगार सी.बी., श्रीमती पाटील जे व्ही, श्रीमती आचार्य व्ही सी, श्रीमती हाडपे एम.सी., श्री शार्दुल के वाय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री पाटील आर एम सर यांनी अध्यक्षीय मनोगतातुन म. फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

.