डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली
पेठ, दि. २७-
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस पर्यवेक्षक श्री केला डी जी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी श्री मोरे सर व श्री केला सर यांनी बालविवाहाचे तोटे समजावून सांगितले व प्रत्येक विद्यार्थ्याने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत कोणी करत असेल तर त्यांना थांबवावे अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
