डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्प हर अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीमती हाडपे मनीषा यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी अध्यक्ष भाषण झाले. लोकहितवादी मंडळ नाशिक व निराधार स्वावलंबन समिती संचलित (निस्वास गुरुकूल) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा विडीओ कॉल पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ५ वी व ६ वी, ७ वी व ८ वी, व ९ वी व १० वी गटात घेण्यात आली. सर्व प्रथम शाळास्तरावर घेऊन त्यातील प्रत्येक गटातून प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड करुन जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धे साठी पाठविण्यात आली. या वेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
