डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा
पेठ -दिनांक 26/06/2025 गुरुवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.श्री. नंदन सर , व श्री. केला सर यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ व त्यांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल अशी माहिती सांगितली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एल.नंदन सर,उपमुख्याध्यापक श्री.केला सर , पर्यवेक्षक सौ.आचार्य.मॅडम उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.केदार. सी.डी.यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
