डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे संविधान दिन साजरा
पेठ, दिं. 36- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम होते. यावेळी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री जनार्दन वाघमारे, श्रीमती ब्राह्मणकार जे आर, श्री बाबाजी अहिरे, पर्यवेक्षक श्री केला डी जी यांनी संविधान दिनाचे महत्त्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर एम यांनी अध्यक्ष मनोगतातून संविधान दिन का साजरा केला जातो त्याचे महत्त्व प्रतिपादन केले. त्याचबरोबर हर घर संविधान या शासनाच्या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान पुस्तिकेचे वाचन केले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामुदायिक संविधान प्रास्ताविक म्हटले. यावेळी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी, उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही सी, श्री वेढणे पी आर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
