News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. सर होते. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रत यांचे पुजन अध्यक्ष श्री सागर सर व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्तविकाचे वाचन सर्व विद्यार्थ्यांनी केले. नंतर श्री केदार सी. डी., श्री केला डी.जी., श्री बाबाजी आहिरे यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातुन सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सागर सर यांनी आपल्या मनोगतातुन भारताच्या संविधाना विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसांचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले, तर आभार श्री पगार सी. बी. यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.