News Cover Image

हरित सेना अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
 हरित सेना अंतर्गत वृक्षारोपण संपन्न 
     पेठ, ता.26/07/2024 वार शुक्रवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे हरित सेना अंतर्गत वृक्ष संवर्धन करण्याच्या उद्देशाने  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पाटील आर.एम. उपमुख्याध्यापक श्री.धात्रक एस.सी. उपप्राचार्य सौ.आचार्य व्ही.सी. पर्यवेक्षक श्री.केला डी.जी ज्येष्ठ शिक्षक श्री वेढने पी.आर. हरित सेना विभाग प्रमुख श्री.परदेशी एम.बी. व श्री.वाघमारे जे. एच. श्री शार्दुल के.वाय. श्री पाठक सी. व्ही. श्री सोनवणे आर. डी. श्री जाधव एन के. यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी खड्डे खोदले वृक्षारोपण करतांना मदत केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.