News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पेठ, ता 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आपल्या भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. होते. यावेळी सर्वप्रथम डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. विजयजी बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना होऊन श्रीमती ब्राम्हणकर जे आर यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नंतर पेठ शहरातून तहसील कार्यालयापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज गुंजाळ, कांतीलाल राऊत, हेमंत सातपुते, उपमुख्याध्यापक श्री सागर एम, उपप्राचार्य श्रीमती पवार जे .पी. पर्यवेक्षक श्री केला डी. जी, श्री वेढणे पी आर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पगार सी बी यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.