आज दि.24/11/2023 रोजी डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय येथे विशाखा समिती अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य. श्री. पाटील.आर.एम हे होते. मार्गदर्शन कायदेतज्ञ सौ. प्रतिभा शिरसाठ यांनी केले. त्यानी विद्यार्थिनींना वेगवेगळे दैनंदिन जीवनातले उदाहरणे देऊन त्याविषयीचे कायदे याविषयी माहिती सांगितली.विद्यार्थिनींचे प्रश्न जाणून त्यावर कायद्याचा कसा वापर करता येईल याची माहिती सांगितली . या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होते.
