पेठ -दिनांक 24/07/2025 वार गुरुवार रोजी सखी सावित्री समिती व महिला तक्रार निवारण समिती तर्फे इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजित करण्यात आले. यावेळी पेठ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती.
सुनिता जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना स्व संरक्षणाचे महत्त्व, स्वतःबद्दल आत्मविश्वास, परिस्थितीनुरूप आपल्यात बदल करणे, अत्याचार म्हणजे काय, त्याला सामोरे कसे जावे यासारख्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थिनीशी चर्चा केली. तसेच विद्यार्थिनीना कायदेविषयक मार्गदर्शनासाठी दादासाहेब बिडकर वरिष्ठ महाविद्यालय पेठ च्या प्राध्यापिका प्राध्यापिका श्रीमती. प्रतिभा शिरसाठ यांना आमंत्रित केले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनी सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांविषयी माहिती दिली व महिला तक्रार निवारण समितीने आजपर्यंत कशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी व शाळा, महाविद्यालय याठिकाणी कार्य करते आहे याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक श्री.ए.एल.नंदन हे अध्यक्ष स्थानी होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थीनी नेहमी सतर्क आणि जागरूक रहावे म्हणजे वेळीच येणारे संकट टाळता येते किंवा मार्ग काढणे सोयीचे जाते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती. एस.सी.पवार यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री.डी.जी.केला, पर्यवेक्षिका श्रीमती. व्ही.सी.आचार्य, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.ए.बी. हुंडीवाले, श्रीमती.गरुड मॅडम, श्रीमती. ब्राह्मणकर मॅडम तसेच सर्व महिला शिक्षिका व शिक्षक श्री.जे. एच.वाघमारे, श्री.सी.ए. पठाडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
