डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पेठ, दि. २४- गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्ट, नाशिक तसेच डांग सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरात त्वचारोग, बालरोग, स्त्रीरोग, गुप्तरोग, डोळे, नाक, कान, दंत, हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग, केस विकार, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार करण्यात आले. यावेळी डॉ. जयसुक मकवाना, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. मोनिका भट्ट, डॉ. राहुल खैरनार, डॉ. गणेश मस्के, नगराध्यक्ष करण करवंदे, गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री प्रशांत जाधव, डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष श्री हेमलताताई बिडकर, श्री मनोज गुंजाळ, श्री महेश डबे, श्री. कांतीलाल राऊत श्री बापू पाटील, श्रीमती सुनिता जाधव, श्री अमृतभाई पटेल, श्री मिनानाथ सोनवणे, श्री.जयंतीभाई पटेल, श्री.रवींद्र वाघ, श्री प्रकाश पगारे, श्री सुनील धोंडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ४३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाटील, उपमुख्याध्यापक श्री मधुकर मोरे, पर्यवेक्षक श्री. दिलीप केला, उपप्राचार्य श्रीमती आचार्य वसुधा यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक श्री जितेंद्र सूर्यवंशी, श्री विनायक दोडे यांच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी झाले. यावेळी कर्मवीर दादासाहेब बिडकर वरिष्ठ महाविद्यालय येथील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले.
