News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला

डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला
पेठ, ता. २३- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे संस्थेचा ८८ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर व माजी सचिव डॉ विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री केला डी. जी., पर्यवेक्षक श्रीमती आचार्य व्ही सी. श्री वेढने पी आर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली.