डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांना संस्थेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
