News Cover Image

जागतिक गणित दिवस साजरा

जागतिक गणित दिवस साजरा
पेठ, ता. २२-आज रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे जागतिक गणित दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी थोर गणिततज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.केला डी जी. यांच्या हस्ते करण्यात आले. श्री केला डी.जी.सर, गणित शिक्षिका श्रीम.पवार एस.सी. यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या प्रसंगी उपसथित होते .