News Cover Image

पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले

पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले
पेठ, ता. २२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील विद्यार्थ्यांनी  ४७ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश संपादन केले. यात ९ वी ते १२ वी च्या गटात चौधरी साहील छगन या विद्यार्थ्याने बनवलेल्या रोबोटीक क्लिनर या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. तर ५ वी ते ८ वी च्या गटात कु. उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे या विद्यार्थ्याने बनवलेल्या न्यु इलेक्ट्रि सिटी या उपकरणाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांना विज्ञान  शिक्षक श्री. केदार सी. डी., श्रीमती गरुड एस.के.,श्रीमती पवार एस.सी. यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्ष मा.ताईसाहेब, सचिव मा. अॅड.मृणालताई जोशी यांनी अभिनंदन केले. तसेच  मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम., उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री केला डी. जी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.