आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पेठ, ता.२१- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज कर्मवीर दादासाहेब बिडकर वरीष्ठ महाविद्यालय, पेठ, कर्मवीर दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूल पेठ, कर्मवीर दादासाहेब बिडकर विद्यार्थी वसतिगृह, जनता कन्या वसतिगृह, जनता विद्यार्थी वसतिगृह,पेठ, पंचायत समिती, पेठ, पोलिस स्टेशन, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी मा. श्री. जगन सुर्यवंशी साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री प्रशांत जाधव साहेब, पोलिस निरिक्षक मा. श्री वसावे साहेब, केंद्र प्रमुख श्री रामदास शिंदे सर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय योग संस्थान, पंजी, योग साधना केंद्र नाशिक चे साधक मा. श्री. शिंदे सर व मा. श्री. तुंगार सर होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम.सर, उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम.सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी., दादासाहेब बिडकर वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री टोचे आर.बी सर सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिक्षक व विद्यार्थी तसेच पंचायत समिती पेठ व पोलिस स्टेशन, पेठ चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने योगा दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
