डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे जागतिक वन दिन साजरा
पेठ, ता.२१ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी यांच्या हस्ते वृक्षाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री जनार्दन वाघमारे यांनी पर्यावरण विषयक व वृक्ष संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. नंतर श्री चंद्रकांत केदार, श्री महेंद्रसिंग परदेशी यांनी पर्यावरण जागृती व वनांचे महत्व सांगितले. यावेळी विद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही सी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जनार्दन वाघमारे यांनी केले.
