News Cover Image

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते. यावेळी सर्वप्रथम या दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी म. गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्रीमती आचार्य व्ही सी यानी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर एम सर यांचे अध्यक्षीय मनोगत झाले. त्यात त्यांनी म.गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. त्यानंतर व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली व रघुनाथ पती राघव राजाराम हे भजन सामुहीकरित्या म्हटले.  यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम. एस सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.