News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
पेठ, ता. २ जानेवारी - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष श्री दामु  पांडु ठाकरे साहेब होते. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री प्रभाकर पवार, श्री श्रीकृष्ण चंद्रात्रे, श्री अ.प्र. देशपांडे, गटशिक्षणाधिकारी श्री प्रशांत जाधव, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डाॅ. आर बी टोचे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री महेश रहाणे, केंद्रप्रमुख श्री रामदास शिंदे, श्रीमती डोगमाने स्वप्नाली होते. 
     यावेळी विद्यालयातील  लेझीम पथकाने सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर स्वामी विवेकानंद व डाॅ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पुजन व नंतर  सरस्वती व कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे  पुजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री पाटील आर एम यांनी केले. यात कार्यक्रमाचा उद्देश व विद्यालयाची प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवण्या बरोबरच अभ्यासातही प्रगती करावी व आपण ज्ञानी व्हावे असा संदेश दिला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. एकुण ४८ कार्यक्रम सादर करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम., पर्यवेक्षक श्री केला डी. जी., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., श्री. वेढणे पी. आर. श्री मोरे एम. एस. कर्मवीर दादासाहेब बिडकर इंग्लिश मेडीयम स्कुलचे प्राचार्य श्री गौरव बागुल,  विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री परेश देसाई, श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीमती अाचार्य व्ही.सी. श्रीमती पवार एस. सी. यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.