News Cover Image

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर एम होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर श्री केदार सी डी, श्री केला डी जी, श्रीमती पवार जे पी, श्री पाटील आर एम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. यावेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.