डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शैक्षणिक वर्ष २०२५- २६ ची उत्साहात सुरूवात झाली. यावेळी सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदन ए.एल., उपमुख्याध्यापक श्री केला डी.जी. पर्यवेक्षक श्रीमती आचार्य व्ही. सी. श्री. वेढणे पी. आर. व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन प्रवेशद्वारावरच स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे पूजनही करण्यात आले. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले नियमित शाळेत येणे नियमित अभ्यास करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले.
