News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे हरितकुंभ अंतर्गत वृक्षारोपण

  पेठ दिनांक- 16/07/2025  डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ व सामाजिक वनिकरण विभाग नाशिक,परीक्षेत्र पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने हरितकुंभ सामूहिक वृक्षारोपण माझा कुंभ माझी जबाबदारी, माझा वृक्ष माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत शालेय परिसरात राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने 50 रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी, विद्यार्थी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक वनिकरण विभाग पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.डी.डी.घुगे, वनपाल श्री.बी.जी.राव, वनरक्षक श्री. एल.के. शेखरे व श्री.बी.एस.महाजन, डेटा ऑपरेटर श्री.अनिल ठाकरे तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.डी.जी. केला, पर्यवेक्षिका श्रीमती.व्ही.सी. आचार्य, राष्ट्रीय हरित सेनेचे श्री.एम.बी. परदेशी, श्री.व्ही.ए. अहिरे, श्री.जे.एच.वाघमारे, श्री.एम.व्ही.सौंदाणे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर आणि विद्यार्थी उपस्थित होते.